बीएमसी आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी फेकल्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील शेतकरी नियमितपणे बोरीवलीमध्ये भाज्या विकत असतात मात्र त्यांना नेहमी पोलिस आणि बिएमसीच्या आधिकाऱ्यांचा त्रास होतो. हे आधिकारी सतत हाप्ता मागत असतात हा जाच असह्य झाल्याने संतप्त शेतकर्याने आज मंत्रालयाच्या गेटसमोर भाज्या टाकून आंदोलन केलं आहे.

बोरीवलीमधून त्यांनी कॅरेटमध्ये भाज्या भरून आणल्या होत्या. यामध्ये मिरची, बटाटा, कांदा, लसून आणि कोथिंबीरीसारख्या भाज्या शेतातील उत्पादने होती. कॅरेटच्या कॅरेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टाकून आंदोलन केलं.

एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्याने अनेक शेतकरी उभे पिक नष्ट करत असल्याची हृदयद्रावक परिस्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. त्यात काही शेतकरी अशा रीतीने आपला उदरनिर्वाह करत आहेत पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या आणि भस्म्या रोग झालेल्या शासन आणि प्रशासनाला मात्र हे सुद्धा देखवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या फेकत आपला रोष व्यक्त केला आहे मात्र, हे असच सुरु राहील तर शेतकरी एक दिवस नक्कीच रुमणं हातात घेऊन मंत्रालयामध्ये घुसला तर नवल वाटायला नको.