आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस; शेतमालाची आवक घटली

पुणे : आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे भाजी -पाला,फळे,धान्य आणि दुधाची शहरांकडे येणारी आवक घटल्याने शेती उत्पादन महागण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दहा दिवसांचा संप पुकारला आहे.शेतकऱ्यांनी  सुरु केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मार्केटयार्डातील भाजीपाला व सर्व प्रकारच्या शेतमालाची आवक घटली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात १० ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे आहे.

राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती व अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी दिनांक १ ते १० जून अशी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या पहिल्या दिवशी शहरात संपाचा कोणताच परिणाम जाणवला नव्हता. मात्र, आता शेतमालासह फळे तसेच फुलांची आवक घटण्यास सुरुवात झाली आहे.