शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठवाडय़ात तिपटीने वाढ

शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना विविध योजनांच्या आधारे मदत केली जात असली तरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होतच आहे. काबाडकष्ट करून देशाचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे मृत्यू आणखी किती काळ उघडय़ा डोळय़ांनी बघत राहायचे? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छन आहे. सरकारला पोकळ आश्वासने आणि भाषणे करून शेतकऱ्यांना जगवता येणार नाही.

शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, ही सरकारची घोषणा असली तरी प्रत्यक्षात उत्पादन खर्चाएवढाही भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. मंत्रालयात बसणारे सरकार शेतीचे हे वास्तव समजून का घेत नाही?  दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा संकटांना सामोरे जाऊन मराठवाडय़ात २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता बदलानंतर शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३.७ पटीने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २० वर्षांत तब्बल ७३३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शेती समस्येमुळेच आत्महत्या झाल्याचे प्रशासकीय पातळीवर तपासणीनंतर कळाले. शेतकरी आत्महत्यांची गेल्या सहा वर्षांतील आकेडवारी ४ हजार २३३ एवढी आहे. त्यात विशेष म्हणजे २०१७ मध्ये भाजप सरकारने दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीही केली. यामध्ये ११ लाख ७६ हजार ८९८ शेतकऱ्यांना पाच हजार ३२५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली, तर दुष्काळ हटविण्यासाठी केलेल्या जलयुक्त शिवार योजनेवर २३२४ कोटी ९३ लाख रुपये खर्च झाले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं – आदित्य ठाकरे

गेल्या दोन दशकांपासून मराठवाडय़ातील शेतीचा प्रश्न हा गंभीर होत असल्याचे दिसत आहे. त्यात पावसाचे अवेळी पडणे आणि त्यामुळे पिकांचे नुकसान होणे. नुकसान झाल्यामुळे कर्जबाजारीपण येते आणि हेच एकमेव कारण असल्याचे सांगत शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यात आली. कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी झाली त्याचा परिणाम शेती होतो आणि शेतकरी हा संकटात येत गेला. परिणामी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची दिशा चुकली किंवा केलेले प्रयत्न कमालीचे तोकडे होते, एवढेच आता म्हणता येईल. सरासरी ९३९ लोक मरतात, हे माहीत असल्याने अनेक अभ्यास करण्यात आले, पण उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकरी कर्जमाफीसाठी 30 हजार कोटींची गरज

‘पुराचं पाणी दोन दिवस घरात असल्यावरच मिळणार मदत’; पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रथमोपचार – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं –