नेवासा येथे शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफ, दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव, शेतमालाला हमीभाव ,स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी आदी प्रमुख मागण्यासाठी शेतकरी क्रांतीकरी पक्ष व शेतकरी सुकाणू समिती, प्रहार, आम आदमी पार्टी आदींसह इतर पक्षीयांच्या सहभागात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे सर्वपक्षीय जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहायला मिळाला.

या आंदोलनात माजी आमदार शंकरराव गडाख, कॉ बाबा आरगडे, कॉ बन्सी सातपुते, अशोक गायकवाड, सुनील गडाख, नानासाहेब तुवर, बाळासाहेब नवले, जबाजी फाटाके, अशोकराव करडक, दिगंबर रिंधे, यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.