राज्यातील शेतकऱ्यांना व सर्वसामन्यांनाही सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळे होणार मोठा फायदा

शेतकरी

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीनी शंभरी गाठल्या नंतर सर्वसामन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. परिवहन मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी करत, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास मंजूरी दिलेली आहे. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी होऊ शकतात. तसंच या निर्णयामुळे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.
आतापर्यंत वाहानांमध्ये कमी प्रमाणात E२० मिसळलं जात होतं. परंतु परिवहन मंत्रालयाच्या नोटिफिकेशननंतर, पेट्रोलमध्ये २० टक्के E२० मिसळलं जाणार आहे. ज्यामुळे वातावरणासह पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरही दिलासा मिळेल. तसंच कार आणि बाईक्स मॅन्युफॅक्चरर्सला सांगावं लागेल की कोणतं वाहन २० टक्केसाठी उपयुक्त आहे. यासाठी वाहनांवर एक स्टिकर लावावा लागेल.

सरकारने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलचं लक्ष्य ठेवलं आहे. परंतु हे लक्ष्य पाच वर्ष आधीच २०२५ पर्यंतच साधण्याची सरकारची योजना आहे. मागील वर्षी सराकारने २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचं लक्ष्य ठेवलं होतं. सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात, पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल ब्लेंडिंग होतं. हेच आता २०२२ पर्यंत वाढवून १० टक्के केलं जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगसाठी १२०० कोटी अल्कोहॉल-इथेनॉलची गरज असेल. ७०० कोटी लिटर इथेनॉल बनवण्यासाठी शुगर इंडस्ट्रीला ६० लाख टन सरप्लस साखरेचा वापर करावा लागेल. तर ५०० कोटी लिटर इथेनॉल दुसऱ्या पिकांपासून बनवलं जाईल.

परिवहन मंत्रालयाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इथेनॉल ऊस, मका आणि इतर काही पिकांपासून तयार केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना कमाईची संधी उपलब्ध होईल आणि साखर कारखान्यांनाही फायदा होईल. इथेनॉल स्वस्त आहे आणि त्यामुळेच सरकारच्या या प्लॅनमुळे सर्वसामन्यांनाही पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बतम्या –