‘शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून फसवत आलात,आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात’

राजू शेट्टी शरद पवार

कोल्हापूर: धारावीतील कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात सुरु झालेला श्रेयवाद हा काही संपत नसल्याचं चित्र सद्या दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले होते. मात्र, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासह अनेक जणांनी याचे श्रेय RSS च्या स्वयंसेवकांना जाते असे स्पष्ट केले होते.

यानंतर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले होते. आता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील धारावी परिसरातील राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली असताना जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती का झोंबली अशी संतप्त विचारणा बुधवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे,उपाध्यक्ष बाजीराव देसाई या त्यासंबंधीचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे पत्रकात ?

वेबसाईटवर जावून संघ समाजासाठी काय काम करतो हे पाहावे व आपण पराभूत झाल्यानंतर समाजासाठी काय केले याची माहिती वेबसाईटवर द्यावी. देशामध्ये ज्या-ज्यावेळी संकटे आली तेव्हा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपण कोरोना महामारीच्या काळात काय काम केले हे एकदा स्पष्ट करावे.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून त्यांना फसवत आलात व आता तर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते.

सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगू शकत नाही हेच त्यातून सिद्ध होते. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे गाताना थकत नाही त्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सांगून वीज बिले माफ करावीत. प्रसिद्धीसाठी वीज बिलांची होळी करून हा प्रश्न सुटणार नाही. सामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असताना फक्त स्वत:च्या आमदारकीसाठी आपण संघावर टीका करणे बंद करावे.

महत्वाच्या बातम्या –