‘शेतकरी काही फुकटा नाही, वीज बिल दुरुस्त करून बिलांवरील दंड व्याज माफ करा’ – राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत आहे कारणं महावितरण कंपनीने शेतीच्या वीजबिल वसुलीसाठी शेतीचा वीजपुरवठा तोडण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शेतीला वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी शेतकऱ्यांना वीज बील भरण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर भाजपकडूनही राज्यभरात महावितरणच्या या मोहिमेविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना वीज बिल (Electricity Bill) भरावंच लागेच. फार तर त्यांनी वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपनं सवय लावून ठेवली आहे. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आला आहे तो कुठून भरायचा?, असा सवालही नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना इशारा दिला आहे.

महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देऊ. सदोष वीज बिल दुरुस्त करा. बिलांवरील दंड व्याज माफ क रा. शेतकरी बिल भरण्यास तयार आहे. शेतकरी काही फुकटा नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे महाविकास आघाडी सरकारला जास्त काम करता आले नाही. मात्र, सरकारने पूरग्रस्तांची निराशा केली आहे. ज्यादा नुकसान भरपाईसाठी मी आजही आग्रही आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यात केंद्र आणि राज्य सरकार दोघेही कमी पडले, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –