fbpx

उस दर आंदोलन चिघळले ; सांगली-सोलापूर मध्ये शेतकरी संघटना आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : ऊसला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत हा दर भेटत नाही तोपर्यंत उस साखर कारखान्यात पोहचू देणार नसल्याचा पवित्रा घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दरवर्षी प्रमाणे यंदा सुधा आक्रमक पद्धतीने उस दर आंदोलन सुरु केल आहे.

ऊस दराबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमधील सुरु असलेली बोलणी गुरुवारी फिस्कटल्यानंतर, शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर-पुणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. फॅबकेट शुगर फॅक्टरीकडे हा ट्रॅक्टर ऊस घेऊन निघाला होता.

आज सकाळी आंदोलकांनी सोलापूरमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले, तर सांगलीत म्हैसाळमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच आंदोलकांनी पळवले.
हळूहळू या उस आंदोलनाच लोन संपूर्ण राज्यात पसरत आहे. उस दराबाबत सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर आता राज्यभर ऊस आंदोलन चिघळत आहे.

जोपर्यंत उसाला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

Add Comment

Click here to post a comment