शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कडधान्य पिकांची लागवड कर – अविनाश कोटांगले

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकांची फेरपालट करुन कडधान्य पिकांची लागवड करणे गरजेचे असल्याचे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले. भंडारा तालुका कृषी विभागाच्यावतीने आयोजित जागतिक कडधान्य दिन कार्यशाळेत ते बोलत होते.

गुलाबाच्या भावात ४० टक्क्यांनी वाढ

भंडारा तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मागदर्शन केले. खमारी मुख्यालयाच्या कृषि सहाय्यक हेमा तिडके यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कडधान्यपिके फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून कृषि सहाय्यक गिरीधारी मलेवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले. तर आभार कृषी सहायक हेमा तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीधारी मलेवार यांनी सहकार्य केले.