शेतकरी कर्जमाफीच्या हिशेबात जाणून-बुजून गडबड – बच्चू कडू

शेतकरी कर्जमाफीच्या हिशेबात जाणून-बुजून गडबड - बच्चू कडू kadu

शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांद्वारे सुरु असलेल्या हिशेबात जाणून-बुजून गडबड केल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केलीय. या तक्रारीची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारकडे एक अहवाल सादर केला आहे.राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीवर एक गंभीर आरोप केला आहे.

ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे रब्बी पिके धोक्‍यात

कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबमध्ये जाणून-बुजून गडबड केली असल्याची अनेक शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे. काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन ते चार पट व्याज लावल्याचं बच्चू कडू यांच्या निदर्शनास आलंय.

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला ; बच्चू कडू

बच्चू कडू यांनी अहवालात स्पष्ट केलं आहे, की सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.