ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी

ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची - राजू शेट्टी raju shetty

ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची आहे, अशी टीका महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने राजू शेट्टी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारचा हा निर्णय अतिशय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का? असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी विचारला.

नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट

भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो, मात्र याचा अर्थ असा नाही की, सरकारच्या चुकांचेही आम्ही समर्थन करू. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याची आणि संघर्ष करण्याचीही आमची तयारी आहे, असे शेट्टी म्हणाले.

दातांची निगा कशी राखावी? दातांसाठी कोणती टूथपेस्ट चांगली?

लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का? आजही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे चित्र निराशाजनक आहे, असे शेट्टी म्हणाले.