ऑनलाईन नोंदणी करूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळेना

योजना

लातूर – राज्यात मागील काही आठवड्यांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक राज्यातील शेतकरी पेरणीच्या कामासाठी धावपळ करत असतो. तसेच शेतकरी कृषि विभागाने आवाहन केल्या प्रमाणे बियानांसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करत आहे. मात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करूनही काही उपयोग होत नसल्याचे दिससात आहे. जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाहीयेत. त्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही विक्रेत्यांकडून बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रमाणित परमिटचे महाबीज बियाणे शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याची मागणी आमदार पवार यांनी त्या निवेदानातून केली आहे. औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२१ साठी सोयाबीन व इतर बियाणे मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या आवाहनानुसार ऑनलाईन नोंदणी केली. ऑनलाईन सोडत निघून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे घेण्यासाठी परमिटही देण्यात आले.

मात्र शेतकरी बियाणे घेण्यास गेले असता बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी बांधवांची अडचण झालेली आहे. बियाणे परमिट मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे तसेच महाबीज बियाणे वितरणातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –