राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

खासदार नवनीत राणा

विमा कंपन्यांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं काढलेल्या मोर्च्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,’ असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

‘जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी,’ अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करताना विलंब करत असल्याचा आरोप करत शिवसेना आज रस्त्यावर उतरली. वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती अँक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला.

महत्वाच्या बातम्या – 

आघाडीबाबत जुलैअखेर निर्णय न झाल्यास स्वतंत्र लढणार’

उद्धव ठाकरे यांना आत्ताच शेतकऱ्यांचा पुळका कसा आला – राजू शेट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त थापा मारता येतात-उद्धव ठाकरे

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.