आपल्या हक्कासाठी दिल्लीत एकवटले लाखो शेतकरी

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता थेट राजधानी दिल्लीमध्ये दिसणार आहे. कारण देशभरातील जवळपास १६२ शेतकरी संघटनांनी एकत्र येत ‘किसान मुक्ती संसद’ आणि देशव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून आज राम लीला मैदान ते संसदेपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. १६२ शेतकरी संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापना केली आहे.

शेती मालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. सध्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले असून महाराष्ट्रामधूनही खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी दिल्लीत आंदोलनासाठी गेले आहेत.