न उगवलेल्या बियाण्यांचा अखेर शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकऱ्यांच्या पेरणीची पाहणी सुरू केली.

शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार घडला होता. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केल्यानंतर या सर्व संदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला होता. अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकऱ्यांना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.

इंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकऱ्यांनी कोणत्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. आता या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकऱ्यांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असे देखील या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन शेतकऱ्याने केली दगडांची पेरणी…

पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा सूचवण्याच्या दृष्टीने बुधवारी पुण्यात व्यापक बैठक

जालन्यातही धरण फुटण्याची भीती; प्रशासनाने लावली ताडपत्रीची ठिगळं