वाळूचे खोदकाम करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यास वाळूमाफियांकडून मारहाण

वाळूमाफिया

गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे़. चोरून वाळू उपसा करताना अनेक वेळा वाळू माफियांकडून मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत़. त्यामुळे वाळूमाफियांची मुजोरी वाढत जात असून, तहसील प्रशासनाने वाळू चोरांविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़.

धारखेड येथील शेतकरी माधव अण्णासाहेब बोबडे हे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतात काम करत होते. मोहन रामदास मुरकुटे (वय २५ रा. झोला ता. गंगाखेड) हे ८ ते १० मजुरांना सोबत घेऊन ते नदीपात्राच्या परिसरात आले. मोहन रामदास मुरकुटे हे नदी पात्रात वाळूचे खोदकाम करीत असताना माधव बोबडे यांनी खोदकाम करण्यास नकार दिला. त्यावेळी मोहन मुरकुटे याने बोबडे यांना शिवीगाळ करीत खोडाच्या दांड्याने मारहाण केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Loading...

ही घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करत असणाऱ्या एका शेतकऱ्यास वाळूमाफियाने मारहाण केल्याची धारखेड शिवारात घडली. माधव बोबडे यांच्या फिर्यादीवरून मोहन मुरकुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमादार हरिभाऊ शिंदे, दत्तात्र पडोळे, रामकिशन कोंडरे तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

कोंढवा दुर्घटना : बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का ? सुप्रिया सुळेंंचा सवाल

Add Comment

Click here to post a comment
Loading…