कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम

कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम cotton kheradi

यवतमाळ येथील कापूस खरेदी जेमतेम पंधरा दिवस पूर्वी सुरू करण्यात आली होती. दरम्यान मोठ्या प्रमाणात कापूस आवक झाल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणला होता. त्यांची कापूस मोजणी झालीच नाही म्हणून अखेर संतप्त शेतकऱ्यांनी शिवाजी चौकामध्ये चक्काजाम केला. यावर्षी दिग्रस मधील एकही कापूस संकलन केंद्र सुरू झाले नव्हते.

शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद

कापूस संकलन केंद्र सुरू करण्यासाठी विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर कापूस पणन महासंघाने सीसीआईच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू केली. जेमतेम आठ दिवस येथील कापूस खरेदी सुरू राहिली. या काळामध्ये शेतकऱ्यां ऐवजी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी आणला परंतु, ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री साठी केंद्रावर आणला.

ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीची लागण

दरम्यान, या काळात शेतकऱ्यांनी संबंधित अधिकार्‍यांना कापूस संकलन केंद्र सुरू करण्याबाबत विनंती केली. परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट पासून शिवाजी चौकापर्यंत आपले वाहन लावून चक्काजाम केला. अखेर तहसीलदार यांनी कापूस पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कापूस खरेदी सुरू केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपली वाहने कापूस संकलन केंद्राकडे नेली.

कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम JAM