लासलगाव परिसरातील शेतकरी झाले हैराण; मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

जनावरांकडून पिकांचे नुकसान

लासलगाव परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्या शेतीवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लासलगाव परिसरात मोकाट जनावरेसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या जनावरांची संख्या जवळपास पाचशेच्या वर आहे. ही जनावरे शेतात टोळक्याने येतात आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते.

तसेच त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर ती जनावरे लोकांना सुद्धा खातात. त्यामुळे त्यांना हाकलवण्याची हिम्मत सुद्धा कोणी करत नाही. या सर्व प्रकाराने तेथील शेतकरी खूप त्रस्त झाली आहेत. या सर्व प्रकारामुळे तेथीलउभ्या पिकात व बाजार समितीत घुसून नुकसान तसेच वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात लासलगाव येथील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर शहरातील दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहनांना भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड अडथळा ही जनावरे निर्माण करत आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन होळकर यांनी लासलगाव व परिसरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनासोबत लासलगाव आणि परिसरातील जवळपास 100 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा श्री सचिन यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

येवलेंचा चहा भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक खुलासा 

बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक

निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

तिबेटमध्ये काळ्या सफरचंदाची शेती, झाडं पूर्ण होण्यासाठी लागतो ८ वर्षांचा कालावधी