‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नसल्याने फुकट वाटला भाजीपाला!

भाजीपाला

उस्मानाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे जिल्ह्यात वारंवार संचारबंदी होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. तर काही शेतकरी भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नसल्याने नागरिकांना मेथीची भाजी विनामुल्य देऊन टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यामुळे बळीराजा पुर्ण कोलमडुन पडला होता. यातुन सावरून पेरणी केली. काहीनी भाजीपाला घेऊन झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. यामुळे आठवडी बाजार पुर्ण बंद आहेत. यामुळे भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नाहीत. झालेला खर्च निघणे सुध्दा मुश्किल झाले आहे. मेथी भाजी १० रुपयाला तीन पेंढया देऊन ही कोणीही खरेदी करीत नाहीत.

यामुळे फुकट भाजीपाला वाटण्याची वेळ वडगाव येथील गोपाळ सुभाष फुलसुंदर यांच्यावर आली आहे. मुख्य चौकात दिवसभर थांबुन ही योग्य भावाने मेथीच्या पेंढया न विकल्याने ५० पेंड्या विनामुल्य वाटुन टाकल्या. या सारख्याच हजारोंशेतकऱ्यांची अशी अवस्था झाल्याने बळीराजावर अस्मानी सुलतानी संकट उभे राहिले आहे. शासनाने बळीराजासाठी विशेष मदत करावी अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या –