पीकविमा फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

आर्णी तालुक्‍यातील हजारावर शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात पीकविमा काढला होता. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी श्रीगणेशा सायबर कॅफेतून या संबंधीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. त्याकरिता विमा हप्त्याचा रीतसर भरणा केला गेला. त्याकरिता सायबर कॅफे संचालकाने त्यांना पावती दिली.

केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर

परंतु, चौकशीअंती ती पावती बनावट असल्याचा खुलासा झाला. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी विमाभरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक झाल्याने त्यांना विमाभरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. आर्णी तालुका कृषी अधिकारी रमेश पसरवाड यांनी केलेल्या चौकशीत ६४९ शेतकऱ्यांची साडेअकरा लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची बाब समोर आली होती.

साखर आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

त्यानंतर सायबर कॅफे संचालक श्रीकांत काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विमा रक्‍कम व भरपाईसंबंधी काहीच हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायासाठी आमदार कडू यांची भेट घेतली. अमरावती येथील या भेटीत त्यांना या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली. आमदार कडू यांनी तत्काळ आर्णी तहसीलदार धीरज स्थूल यांच्याशी संपर्क साधत कार्यवाहीचे आदेश दिले.