शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने लुटणाऱ्यांना सोडणार नाही: राजू शेट्टी

नाशिक: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या लिलाव व हस्तांतरणात सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी येत्या दोन दिवसात होईल तसेच हा प्रश्न शेवटपर्यंत तडीस नेणार असुन राज्यातील राजकीय व्यवस्था बदलली तरी कारखाने लुबाडणारे सुटणार नाहीत, असे राजू शेट्टीनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची मुल्यांकण व लिलावाची किंमत कमी दाखवुन विविध राजकीय नेत्यांना त्याचे हस्तांतरण झाले तसेच यामध्ये सुमारे एक हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हि सदर माहिती खासदार राजू शेट्टी यांनी माहितीचा अधिकार मार्फत माहिती मिळवली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची येत्या एक दोन दिवसांत सुनावणी होणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.