शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ,कृषी तज्ज्ञांचा सल्ला

पेरणी

पावसाळा आला की शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु होतात. मग त्यामध्ये आपण कुठले पीक घ्यायचे त्यापासून तर त्याला कुठले खत टाकायचे आणि अश्या बऱ्याच गोष्टींची चिंता शेतकऱ्याला असते. पण त्यात आता आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणि तुरळक पाऊस झाला. शेतकऱ्यांचे सर्व पीक हे पावसावरच अवलंबून असते.आता झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड देखील केली. पिकाची लागवड केल्यानंतरही त्याला पावसाची अत्यंत गरज असते.

विश्रांतीनंतर पावसाचा जोर उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार – हवामान विभाग

परंतु आता झालेल्या पावसानंतर बुधवार (ता.१७) पर्यंत पावसाचा खंड असल्याने ही लागवड उलटण्याची शक्‍यता आहे. जर ही लागवड उलटली तर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

पीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच ; खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही

जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी त्यात पुरेसा ओलावा असण्याची आवश्‍यकता राहते. सरासरी १०० मि.मि. पाऊस झाल्यास त्यापुढील काळात पावसाने खंड दिला तर त्या ओलाव्याच्या बळावर बियाण्याची उगवण होऊ शकते. परंतु जर कमी प्रमाणात पाऊस झाला तर हीच पेरणी उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी १०० मि.मि. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आणि त्यांनी पेरणीसाठी कुठलीही घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ; मराठवाड्यतील शेतकऱ्यांना दिलासा

तसेच हवामान खात्याकडून ११ ते १७ जूननंतर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांनी १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय कापसाची पेरणी करुच नये. यामुळे मोठे नुकसान संभवते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस

खबरदार ! शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज देताना बँकांनी टाळाटाळ केली तर…