पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये – दादाजी भुसे

Dadaji Bhuse

सोलापूर – पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काल केले. श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे आदी उपस्थित होते. बैठकीत खते, बियाणे यांची उपलब्धता, खरीप पीक कर्ज वाटप, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज वितरण अशा विविध बाबतीत चर्चा झाली.

‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’

श्री. भुसे यांनी जिल्ह्याचा खताचा पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल. मागेल त्याला शेततळे, शेततळ्याला कागद आणि इतर योजनांसाठीच्या थकित अनुदानापोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगितले.

‘पोकरा’च्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया करणार सुलभ – दादा भुसे

सोयाबीनच्या बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पंचनामे करा. त्याच कंपनीच्या बियाण्याबाबत पुन्हा तक्रार आल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करावी लागेल, याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. ज्या बँका पीककर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा, असे श्री. भुसे यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : असे करा आधार प्रमाणिकरण…

श्री.बिराजदार यांनी हंगामाबाबत आढावा घेतला. कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक संतोष सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे उपस्थित होते.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • कृषी विभागाने 15 दिवसांपूर्वीच खते-बियाणांचे नियोजन पूर्ण केले.
  • सोलापूर जिल्ह्यात 27 टक्के पेरणी पूर्ण.
  • खताच्या बाबतीत कमतरता नाही.
  • युरियाचे एक आवंटन येणे बाकी.
  • सोयाबीन काही ठिकाणी उगवलं नसल्याच्या तक्रारी.
  • कृषी विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवालाद्वारे कारवाई करतील.
  • जिल्ह्यात 1438 कोटी पीक कर्जांचा लक्षांक.

बँकांनी किरकोळ कागदपत्रांसाठी पीक कर्जप्रकरणे नामंजूर करू नये – सुनील केदार

  • 35.55 टक्के पीक कर्ज वाटप. 15 जुलैपर्यंत 100 टक्के वाटप होण्याची आशा.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 63 हजार 573 शेतकऱ्यांना 567 कोटी 44 लाख रूपयांचे वाटप.
  • शेतकऱ्यांना जास्तीचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना.
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना.
  • बनावट खते-बियाणा विक्री करणाऱ्यांवर कारवाई.
  • 16 कृषी सेवा केंद्रावर कारवाई तर दोन दुकानदारांना अटक.
  • दूध दराबाबत योग्य तोडगा काढू.

महत्वाच्या बातम्या –

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

गरज भासल्यास नियमाच्या चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार – दादाजी भुसे