शेतकऱ्यांनी एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करू पाहा – कुमारस्वामी

कुमारस्वामी

बेंगळुरू – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

मोदी सरकारने कृषी कायदे आणल्यामुळे नुकतंच पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. या कायद्यांना कडाडून विरोध करत, प्रकाशसिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यानंतर आता राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.
दरम्यान, एका बाजूला मित्रपक्ष साथ सोडत असताना दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात एक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांनी एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करू पाहा, असं कुमारस्वामी म्हणाले.

केंद्र सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे. नवीन कायद्यांची अंमलबजावणी होऊ द्या, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलंय. काही समस्या असल्यास कायदे मागे घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे’, असं कुमारस्वामी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –