शेतकऱ्यांचे निवेदन ; हेक्टरी ३० हजार रुपये मदत देण्याची मागणी

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कपाशीसह रब्बीतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये मदत स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी विकास मंडळाने तहसीलदाराकडे केली आहे.

शेतकरी मंडळाने जे निवेदन दिलेले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘‘नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वच पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये अनेक शेतकरी हे कापसाचे उत्पादन घेतात तसेच त्यासोबत बाजरीचे ही उत्पादन घेतात. पावसामुळे या दोन्ही पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. तसेच प्रशासन त्याचे पंचनामे करत आहे. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर मदतीचा विचार होईल. सध्या स्थिती पाहता शेतकरी हा आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना सध्या तातडीने हेक्टरी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी.’’

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य संतुलित राहण्यासाठी हे आहेत बीटाचे फायदे

शेतकऱ्यांनो काठीण परिस्थितीत मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका ; कृषीमंत्री

परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड