विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणा

काल म्हणजेच २८ जानेवारी रोजीउस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील 500 शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसले होते. महापारेषण आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी आमची परवानगी न घेता सरकारचा प्रोजेक्ट आहे असं सांगून आमच्या जमिनीत उच्च विद्युत वाहिनीचे टॉवर उभे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच टॉवरमुळे जमिनींची किंमत शून्य झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ – हरीभाऊ बागडे

शासनाने तत्काळ या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.आंदोलनाबाबत बोलताना एक शेतकरी म्हणाले की, या भागातले शेतकरी खूप वर्षांपासून त्यांच्या शेतामध्ये बागायती पिके घेत आहेत. परंतु अनेकांच्या 7/12 वर जिराईत शेती उल्लेख आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचा मोबदला हा बागायती जमिनीप्रमाणे देणे अपेक्षित आहे. परंतु सदर कंपन्या जिराईती शेतीप्रमाणे मोबदला देत आहेत. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.