विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

शेतकरी अडचणीत

शेतकऱ्यावर संकटे ही नेहमीच येत राहतात. तसेच ती संकटे सद्याच्या कळत वाढतच आहेत. त्यामध्ये कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. मागील वर्षी तर आपल्याला माहीतच आहे की पाण्याची किती कमतरता होती. त्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी पातळी ही खूप घटली होती व त्यामुळे पिके जळून गेली होती.

सुमन चंद्रा यांनी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती केल्या जाहीर

असे वारंवार होत असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. पण मात्र यावर्षी पावसाची खूप मोठी कृपा ही शेतकऱ्यावर झाली. पावसामुळे पिके चांगली वाढू लागली आणि त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. पण मात्र दुसरीकडे पाहता शेतीला पाणी देण्यासाठी लागणार वीजपुरवठा वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांचे भरणे होत नाही. त्यामुळे पाणीसाठा उपलब्ध असूनही विजेच्या फटका शेती पिकांना बसत आहे.

तसेच महावितरण यांच्याकडून केल्या जाणार्‍या कमी दाबाचा आणि वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही वीज खंडित होते त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मित आपत्ती शेतकर्‍यांवर ओढवली असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांना मोफत वीज देण्यास अजित पवारांचा विरोध; असले फुकटचे धंदे करू नका

तसेच आज मलकापूर तालुक्यातील वाघोळा येथील संतप्त शेतकऱ्यांनी दसरखेड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पोहचून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतोय तर शिवाय अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्‍यांचा जादा अंत न पाहता शेतीसाठी पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

नागरिकांना मोफत वीज देण्यास अजित पवारांचा विरोध; असले फुकटचे धंदे करू नका

सुमन चंद्रा यांनी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती केल्या जाहीर