शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील

शेवगाव: शेती मालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ.विलास खंदारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालयात आयोजित अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.एन. वाबळे होते.

यावेळी डॉ.संजय नलवडे, भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संभाजी काळे, अप्पासाहेब खंडागळे, के.के.पवार हे उपस्थित होते. व प्रास्ताविक प्रा.नाबदे यांनी केले. यावेळी दिपक देवकर व देशमुख मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. आणि प्रा.महेश शेजुळ सर यांनी आभार मानले.