आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

पुणे:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावासह विविधा मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या सुटीमुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शहरात शेतमालाचा तुटवडा जाणवणार असल्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे शहरांची दूध आणि भाज्यांची रसद तुटली होती. आंदोलन काळात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावर तोडगा काढत राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र, राज्यातील शेतकऱ्याना  संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांवर जाचक अटी लादल्याची टीका सुकाणु समितीने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याचा शेतमालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Add Comment

Click here to post a comment
Loading…