अबकी बार लांबूनच नमस्कार; शेतकऱ्याच्या मुलाने मांडले ‘कापसाचे गणित’ सोशल मिडीयावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर शेतकऱ्याच्या मुलाने मांडलेल कापूस उत्पादनाचे अर्थकारण तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कापसाची लावणी ते काढणी आणि पुन्हा बाजारात नागवला जाणारा शेतकरी याचा सर्व ताळेबंद हिशोब लावण्यात आला आहे. तसेच सरकारच्या अनास्थेवर टिका करत ‘अबकी बार लांबूनच नमस्कार’ अस देखील लिहिण्यात आल आहे. दरम्यान हे पत्र कोणी लिहील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

पांढर सोन मानल्या जाणाऱ्या कापसाच्या उत्पादनाचे अर्थकारण दिवसेदिवस बिघडत चालेले आहे. वाढलेले बियाणांचे दर, फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचे वाढलेले भाव. शेतात काम करणाऱ्या मजुरांचा मोबदला या सर्व गोष्टींचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यातच चांगल उत्पादन झाल तरी बाजारात योग्य मोबदला न मिळाल्याने केलेला खर्च देखील वसूल होत नाही.

सरकारकडून दरवर्षी हमीभावाची आश्वासने दिली जातात. मात्र शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी पडते ती निराशाचाच. यामुळे आजवर शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील सरकारकडून ठोस पाउले उचलली जात असताना दिसत नाहीत.

अबकी बार लांबूनच नमस्कार; शेतकऱ्याच्या मुलाने मांडले ‘कापसाचे गणित’ सोशल मिडीयावर व्हायरल farmers son letter about cotton