कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे “ट्‌विटर मिशन”

कांदा निर्यातबंदी

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये  कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्वत्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कांदा 200 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. स्वयंपाकघरे आणि उपाहारगृहातूनही सर्वसामान्यांचा आवडता कांदा गायब झाला होता. पण आता सद्याच्या परिस्थितीमध्ये कांद्याची आवक ही खूप वाढली असून त्याच्या भावात खूप प्रमाणातघसरण होत आहे. सद्या राज्यात तशीच परिस्थिती आहे.

पाणी संकटावर मात करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कर

कांद्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरले. एवढे करूनही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आता “ट्‌विटर मिशन’ मोडवर सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. ट्‌विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून निर्यातबंदी उठवण्याची मागणी रेटण्यात येणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात एंटरटेनमेंट, हॉटेल व्यवसायिक आदींसोबत चर्चा – आदित्य ठाकरे

राज्यभरातील  सर्व कांदा उत्पादकांना या मोहिमेत सहभागीकेले जाणार असून, शेतकरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ट्विटरद्वारे निर्यातबंदी उठवण्याची विनंती करतील, अशी माहिती भारत दिघोळे यांनी दिली.

आता त्यासाठी “महाराष्ट्राचा कांदा उत्पादक ऑन ट्‌विटर हे मिशन राबविण्यात येईल. त्यामध्ये सर्व कांदा उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित आहे. ट्‌विटर नेमके कसे वापरायचे, याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – दादा भुसे

मसुरे लघु पाटबंधारे प्रकल्पास २२ कोटी ११ लाखांची प्रशासकीय मान्यता – शंकरराव गडाख