हिंगोलीत शेतकऱ्यांनी केली पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २0१९ ला मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. त्यामध्येच काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले. यादरम्यान प्रशासन व कंपनीत खूप वाद होता. यात अनेक शेतकऱ्यांची नावेच पीकविमा यादीत नसल्याने अशा विविध प्रकारच्या तक्रारी घेवून शेतकरी या कंपनीच्या कार्यालयावर जात आहेत. बजाज अलायंझ कंपनीने शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेतला त्यानंतर शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही.

कंपनीकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती याला वैतागून शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात काल दुपारी बाराच्या सुमारास हे कार्यालय गाठले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. आतमध्ये असणाऱ्या फायबर टेबलची त्यांनी तोडफोड केली.कार्यालयांमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे सापडलीत. ते पाकीट आणि बाटल्या दाखवत कंपनीने कार्यालय नव्हे, तर हा दारुचा अड्डा बनवला असा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच तक्रारींचीही दखल घेण्यास कार्यालय तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून फक्त पीकविमा भरून घेतल आहेत पण एकदाही विमा मिळाला नाही. याकडे सरकारचेही लक्ष नसून कंपनीसोबत सरकारही या लुटीत सहभागी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

कारखानदार प्रतिनिधींच्या बैठकीला दांडी मारून राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट

आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू- सुभाष देसाई

शेतीलिलाव आणि सक्तीची कर्जवसुली थांबवण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे नाशिक जिल्हा बँकेसमोर ठिय्या आंदोलन

रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकऱ्यांचा मातोश्री बंगल्यापर्यंत मोर्चा