प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल – नवाब मलीक

प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल - नवाब मलीक malik

दामपुरी येथेकी काल म्हणजेच  २५ जानेवारी रोजी  कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रमात नवाब मलिक यांनी नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानातून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये गटशेतीचे महत्त्व पटू लागल्याचा अनुभव आला. शेतकऱ्यांच्या कंपन्यांमध्ये शेतकरी-कारखानदार तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, कृषी आणि उद्योग या विभागांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावी – गुलाबराव पाटील

मंत्री नवाब मलिक म्हणाले, ‘‘राज्यातील लहान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून एकत्र येणे आवश्यक आहे. सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक फायदा होईल. त्यासाठी हा कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी मदत करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे.