केंद्राच्या ‘या’ धोरणामुळे शेतकरी खड्यात जातील.. – राजू शेट्टी

केंद्र

कोल्हापूर – केंद्र सरकारने(Central Government) नुकताच साखर निर्यातीवर(Sugar exports) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्राचा निर्णय हा मूर्खपणाचा असून नुकसानदायक आहे अशी जोरदार टीकास्त्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सोडले. या धोरणामुळे संपूर्ण उद्योगधंद्यांसह शेतकरी खड्यात जातील असे ते म्हणाले.

१ जून पासून केंद्र सरकार(Central Government) साखर निर्यातीवर बंदी घालणार आहे, त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच संतापले असून ते म्हणले कि रशिया – युक्रेन युद्धात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती त्याचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, कांदा निर्यात बंदी केली आता कांदा एक रुपया दराने शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. साखरेवर जर बंदी घालत असाल तर यांचेही असेच हाल होतील शेतकऱ्यांसोबत उद्द्योगांचे हि मोठे नुकसान होईल, आणि साखर उद्योग कोलमडून पडेल. तसेच राज्यात आजून हि हजारो एकरातील ऊस गाळपाविना पडून आहे. ऊस गाळपाला जात नाही म्हणून एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –