काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही – राजू शेट्टी

राजू शेट्टी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला अआहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Loading...

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे. तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे. ही सर्व चेष्टा सुरु आहे. राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहीत नाही. आपली काळी टोपी घालून नुसतं राजभवनात बसतात. खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावं, शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घ्याव्यात आणि ही तुटपुंजी मदत जाहीर करताना दहा वेळा विचार करावा, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

यंदाच्या खरिपात ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्टरवर खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायत, तर ३२ हजार हेक्टरवरील फळपिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यासाठी मान्यता

बळीराज्यामुळेच आपण जगतो त्याला अशी भिक नका देऊ – रुपाली चाकणकर

राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

Add Comment

Click here to post a comment




Loading…