शेतकऱ्यांना मिळेल आता तीन टप्प्यात ऊस दर

ऊस

सांगली : जगात साखर उत्पादन करणाऱ्या देशामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांच जाळं पसरलं असून इथलं अर्थकारण आणि राजकारण साखर उद्योगाभोवती फिरत असतं. भारतात सुमारे 40 ते 50 लाख हेक्टर वर उसाची शेती केली जाते. त्यातही 80 टक्के शेतकरी हा गुंठ्ठ्यात शेती करणारा आहे तर 20 टक्के शेतकरी एकरी उसाची लागवड करतो. त्यामुळे भारत दुसऱ्या क्रमाकांचा साखर उत्पादक देश आहे.

पण सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देण्यात येणार आहे. हा पॅटर्न सांगली जिल्ह्यात राबवण्यात येणारअसून त्यावर राळ उठू नये यााठी शेतकर्‍यांकडून संमीतपत्रावर सह्या करुन घेतल्या आहेत. त्यातील पहिला हप्ता हा 2400 रुपये,  दुसरा हप्ता हा जूनमध्ये मशागतीसाठी 200 रुपये आणि तिसरा हप्ता हा दिवाळीसाठी 200 रुपये असे तीन हप्त्यात उसाचे पैसे देवू, असे कारखानदारांनी सांगितले आहे.

पण आतापर्यंतची दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याबाबत कारखानदारांनी फसवणूक केली आहे. ती फसवणूक पाहता शेतकरी हे खूप नाराज आहेत. उर्वरित जिल्ह्यांपेक्षा आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील कारखान्यांच्या दरापेक्षा हा हप्ता कमी आहे.

त्यातच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी 2750 ते 2800 रुपयांची पहिली उचल दिली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात  कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा चारशे रुपये कमी दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते या प्रक्रियेवर नाराज आहेत, तरी शांत राहण्याचे ठरवले आहे.

असे असतानाही FRP शंभर टक्के दिली जाईल, याविषयी खात्री बाळगावी, अशी ग्वाही क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले कि, सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देणेच योग्य होईल. शेतकर्यानी याला मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आम्ही हा पॅटर्न राबवत अहोत.

महत्वाच्या बातम्या –

राजमा लागवड पद्धत

जाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…