बिट उत्पादक शेतकरी संकटात, योग्य बाजारभाव मिळत नसल्याने चिंताग्रस्त

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बीट उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे .बिट फळभाज्या पीक चांगल आल असताना, त्याला योग्य बाजार भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय .त्यामुळे बीट ,जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. या फळभाजीसाठी लागणाऱ्या बियाणांचा ,खतांचा ,मजुरीचा आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांवर मोठी नामुष्की ओढवलिय. त्यामुळे पीक चांगले आले असून सुद्धा शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही ,त्यामुळे शिरूर तालुक्यातील बीट उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत