शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज विरोधात शेकापचे अन्नत्याग आंदोलन

पुणे – उस्मानाबाद येथील कळंबच्या शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या ऊसाची बिले दिली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आणि शेकापने साखर संकुल येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

२०१७-२०१८ च्या गळीत हंगामात तेथील शेतकऱ्यांनी ५९०२० मेट्रीक टन इतका ऊस गाळप केला. ऊस गाळप केल्यानंतर एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत त्या शेतकऱ्याला पैसे देणे बंधनकारक असते. पण, ५ महिने उलटून गेले तरी कारखान्याच्या प्रशासनाने ही बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून नवीन ऊस लावायला पैसे नाहीत. तर पैसे दिल्याशिवाय व्यापारी खत, बियाणे देत नाही. त्यामुळे ही बिले लवकरात लवकर मिळावी, यासाठी साखर संकुल येथे शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शंभु महादेव साखर कारखान्याने सन 2017-18 मध्ये 59020 मे,टन ऊसाचे गाळप केले मात्र  शेतकऱ्यांना एक ही रुपया दिला नाही एफ आर पी प्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊस गाळपाची रक्कम देणे बंधनकारक  आसताना देखील आज पर्यंत पैसे मिळाले नाहीत.अनेक वेळा तक्रारी आंदोलन करुनही पैसे मिळाले नाहीत. साखर आयुक्त पुणे यांनी शेतकऱ्यांचे थकित 979.03 लाख रुपये कारखान्यची मालमत्ता विक्री करुन द्या असे आदेश देऊन ही 3 महीने लोटले तरी कुठलीच कारवाई झाली नाही.

शेतकऱ्यांना पेरणी आगोदर ऊसाचे बिल देणे गरजेचे आहे मागील वर्षीचे ऊस साठी लागणारे खत औषधे याचे आजुन देणे बाकी आहे पेरणी साठी लागणारे बियाणे ,खत मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कुठून करणार ? यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत आला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून संबंधित शेतकऱ्यांचे थकित ऊस बील पेरणी आगोदर द्यावे अशी मागणी शेकापचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट आणि करमाळा तालुका चिटणीस भाग्येश्वर गवेकर यांनी केली आहे.