बापरे! पेट्रोल-डिझेल आज चांगलेच भडकले

पेट्रोल-डिझेल

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने सरकारी तिजोरीमध्ये 28 हजार कोटींची भर पडणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता.

देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे 2 रुपये 30 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे आज पेट्रोलचा दर 78 रुपये 57 पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर 69 रुपये 90 पैसे प्रतिलीटर झाला आहे.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचे अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारने ठरविले आहे. मात्र आगामी काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल.

महत्वाच्या बातम्या –

जालन्यातही धरण फुटण्याची भीती; प्रशासनाने लावली ताडपत्रीची ठिगळं

Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन
Loading…