‘साथीचे आजार’ निर्माण करताहेत कोरोनाची भीती ; सर्दी, खोकल्याने अवघा महाराष्ट्र हैराण !

मुंबई – महाराष्ट्रात सध्या थंडी(Cold) बऱ्यापैकी जाणवते त्यात ढगाळ वातावरण आणि हवेत असणारा गारवा यामुळे शहरात व ग्रामीण भागांमध्ये साथीचे आजर वाढल्याचे दिसते. सर्दी खोकला व ताप (Cold, cough and fever) येणे ह्यांची रुग्ण संख्या मोठी असून आवश्यक ती काळजी(Care) घेणे गरजेचे आहे असे आवाहन तज्ञ डॉक्टर करत आहे.

हो साथीचे आजार निर्माण करत आहेत कोरोना(Corona) आजाराची भीती…
सर्दी खोकला व ताप येणे हि कोरोनाची(Corona) सामान्य व प्राथमिक लक्षणे आहेत. सध्या हवामान बदलामुळे अनेकांना हा संसर्ग होतो त्यामुळे अशी भीती वाटते कि आपल्याला कोरोना झाला कि काय मात्र अशे लक्षणे असल्यास कोरोना होत नाही घाबरून न जात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच कोरोनाची तिसरी लाट हि पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही त्यामुळे आपण काळजी घ्यावी व इतरांना संसर्ग होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी असे मत हॉस्पिटल डॉक्टर बोर्ड ऑफ इंडिया चे अध्यक्ष (Chairman of Hospital Doctors Board of India) डॉ संजय पाटील यांनी व्यक्त केल आहे.

अशी काळजी घ्या…
पाणी मुख्यतः उकळून प्यावे, बाहेरील रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणे टाळा, जेवण्याआधी स्वच्छ पाण्यानी हात धुवा, साधा आहार घ्या पौष्टिक आहारच समावेश करावा, मास्क वापर सोशल डिस्टन्स पाला तसेच नियमित व्यायाम करावा व डॉक्टरांच्या सल्याने उपचार घेणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या –