नरभक्षक वाघिणीची काटोल परिसरात दहशत

नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व त्यानंत बोर अभयारण्यात हैदस घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचे लोकेशन ,शुक्रवारी सकाळी काटोल तालुक्यातील गोंडीदिग्रस भागात दिसून आले. त्यामुळे या परिसरातील गावातील नागरीकांना सर्तकतेचा इशार देण्यात आला आहे. ही वाघीण गुरुवारी,5 ऑक्टोबर रोजी नरखेड तालुक्यातील दिंदरगाव परिसरात होती. वन विभागाच्या वतीने गुंगीचे औषध देवून तिला बेशुध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अदयापही त्यांना यात यश आले नाही.

ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रात अनेकांचे जीव घेणाऱ्या या वाघिणीला पकडल्यानंतर नागपुरातीळ गोरेवाडा येथे ठेवण्यात आले होते . यानंतर रेडीओ कॉलर बसवून तिला बोर अभयारण्यात सोडण्यात आले होते. परंतु तीथेही तिने दोन जणांना आपले भक्ष्य बनविले. यामुळे वन विभागाने तिला परत पकडण्याची मोहीम हाती घ्यावी लागली आहे.

Loading...

गेल्या चार दिवसांपासुन वन विभागाचे अधिकारी तब्बल १५० कर्मचाऱ्यांचा ताफा घेवून तिच्या मागावर आहे. रात्र होताच ही वाघीण आपली जागा बदलत असल्याने वन विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ही नरभक्षक वाघीन दिंदरगाव परिसरात होती. यानंतर ती मसली शिवारातुन सिंगारखेडा कडुन खामली मार्गाने गोंडिदिग्रस येथे आली. रात्र भरात तिने तब्बल २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला. त्या ठिकाणी तिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने गोडिदिग्रसच्या परिसरातील ५ किलोमीटर परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना शेतात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

Add Comment

Click here to post a comment
Loading…