पेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील

जयंत पाटील

मुंबई – गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, दाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसतांना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ४०० ते ५०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

‘पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे मात्र आता खतांच्या किंमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील,’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

हत्वाच्या बातम्या –