खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? – राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. बियाणे देताना सरकारच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उगवणक्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने कृषी विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्रत्यानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आघाडी सरकारातील मंत्री हाताची घडी अन्‌ तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? .

तसेच पाटील म्हणाले, “”शासनाचा अंगीकृत विभाग असलेल्‍या महाबीजकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक व्‍हावी, हे अतिशय दुर्दैवी असून, सोयाबीनच्‍या उगवण क्षमतेचे निकषही यंदा बदलले आहेत. हाती येईल तसे बीयाणे राज्‍यात विकले गेल्‍याने, शेतकऱ्यांचा खर्चही दुप्‍पट झाला. खासगी कंपन्‍याकडूनही झालेली फसवणूक पाहाता कृषि विभागाचा हलगर्जीपणाच  यामुळे चव्‍हाट्यावर आला असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

योजना देणारे बनु नका तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना पिका बाबत ज्ञान देणारे बना

”बांधावर खते देण्याच्या योजनेचा पूर्णत: फज्जा उडाला. कृषी सहायकही बांधावर पोचू शकले नाहीत. खत खरेदीच्या पावत्या दिल्या जात नाहीत.” शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. कंपन्या आणि दुकानदारांनापाठीशी घालण्याचे काम केले.

पपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका !

बियाणे कंपन्‍यांकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीमुळे दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस

नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार