Festive Season Offer | OLA इलेक्ट्रिक स्कूटर वर बंपर ऑफर

Festive Season Offer | OLA इलेक्ट्रिक स्कूटर वर बंपर ऑफर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सणासुदीची वर्दळ सुरू आहे. प्रत्येक कंपनी आपल्या प्रॉडक्ट्स वर बंपर ऑफर देत आहेत. त्याचवेळी देशात इलेक्ट्रॉनिक स्कूटरची मागणी देखील वाढली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या गेल्या आहेत. आणि याच संधीचा फायदा घेत ओला (OLA) आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वर आकर्षक ऑफर देत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर च्या सेगमेंटमध्ये ओला ने सगळ्यात जास्त स्कूटर विकून सहाव्या क्रमांकावर थेट पहिल्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्याचबरोबर महिन्याभरापूर्वी पहिल्या क्रमांकावर इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी हिरो कंपनी आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

Ola, Okinawa, Hero Electric, Ather Energy आणि Ampere या 2022 मधल्या इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या आघाडीच्या कंपनी आहे. या सर्व कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात पाच हजाराहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर ची विक्री केली आहे. या सेगमेंट मध्ये ओला पहिल्या क्रमांकावर पोचली आहे.

OLa इलेक्ट्रिक स्कूटर

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर विक्रेता कंपनी ओला आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro मॉडेलची किंमत जवळजवळ 10,000 हजार रुपयांनी कमी केली आहे. किंमत कमी झाल्यानंतर ही स्कूटर आता 1.30 लाख रुपयांमध्ये मिळेल. कंपनीने ही ऑफर दसऱ्यापर्यंतच म्हणजेच 5 ऑक्टोबर पर्यंत ठेवली आहे. दसऱ्यानंतर ही स्कूटर तिच्या मूळ किमतीत उपलब्ध असेल.

या स्कूटरची बुकिंग कशी करता येईल ?

ओलाच्या अधिकृत वेबसाईटला olaelectric.com भेट देऊन तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता.

या स्कूटरची किंमत

ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती बद्दल बोलायचे झाले तर OLA S1 ची किंमत 1 लाख रुपये असून OLA S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या