निकृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा – शेतकरी मराठा महासंघ

निकृष्ट बियाणे

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीन बियाणे निकृष्ट पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत 768 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. पंचनामे करून बियाणे उगवण झाली नाही, याबाबत तालुका तक्रार निवारण समितीने स्पष्ट केले.त्यांना कोण पाठीशी घालत आहे? याची चौकशी करून निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. आठ दिवसात दखल घेतली नाही तर राज्यभरातील प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करतील व कृषी कार्यालय कार्यकर्ते बंद करतील असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्याच्या “कबिरे” ला भावपूर्ण निरोप, घरासमोर उभारली समाधी

संभाजी दहातोंडे पाटील यांनी आज ( बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगर जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीन बियाणे निकृष्ट पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत 768 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. पंचनामे करून बियाणे उगवण झाली नाही, याबाबत तालुका तक्रार निवारण समितीने स्पष्ट केले. मात्र कोपरगाव व पारनेर येथे प्रत्येकी एका कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तब्बल 31 कंपन्यांनी निकृष्ट बियाणे पुरवठा केलेला आहे.

महागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……

इतर कंपन्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही? त्यांना कोण पाठीशी घालत आहे? याची चौकशी करून निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात बियाणे विक्री करण्याला बंदी घालावी अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही याआधीही अपनाकडे निवेदन दिलेले आहे.

मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत स्वतः लक्ष घालून कारवाई करावी, आठ दिवसात दखल घेतली नाही तर राज्यभरातील प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करतील व कृषी कार्यालय कार्यकर्ते बंद करतील असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

पुढील चार दिवस पावसाचे; हवामान खात्याने महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना केला अलर्ट जारी

जनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा