चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल

पुणेे : अल्पभूधारक शेतकऱ्यांची आजच कर्जमाफी करतो, असे वक्तव्य करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत भारत अगेन्स्ट करपशनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी खडकी येथे याचिका दाखल केली आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे 11 जून 2017 रोजी पुणे दौऱ्यावर आलेले असताना सह्याद्री अतिथीगृहात अल्पभूधारक शेतकऱ्यांची आजच कर्जमाफी करीत आहे. 12 जूनला आपआपल्या बँकेत जाऊन नवीन कर्ज घ्यावे अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

मात्र शेतकरीवर्ग बँकेत गेल्यावर त्यांची फसवणूक झाली. त्यामुळे असून चंद्रकांत पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी या याचिकेत हेमंत पाटील यांनी मागणी केली आहे. या प्रकरणी फिर्यादी हेमंत पाटील यांना न्यायालयाने चार सप्टेंबर रोजी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे