…अखेर निवडणूक आयोगाची घोषणा; १८ जुलैला होणार राष्ट्रपतीपदासाठी मतदान!

मतदान

 

दिल्ली –         निवडणूक आयोगाने घोषणा(Announcement by the Election Commission) केली असून येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी(Voting)मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने भारताच्या १५ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राजीव कुमार म्हणाले कि मतदारांची एकूण संख्या ४,८०९ असणार आहे, त्यात ७७६ खासदार आणि ४०३३ आमदारांचा समावेश असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच खासदार हे संसद मध्ये मतदान(Voting) करणार असून आमदारांसाठी आप आपल्या राज्यांचे विधानसभा असतील.

तसेच म्हणाले आहे कि लाच किंवा दुसऱ्या कोणत्या मार्गाने जर तुम्ही मत मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा आहे. असं काही आढळल्यास सर्वोच्च न्यायालय निवडूंक बेकायदेशीर झाली आहे असे ठरवू शकते. कोविड सध्या परिस्तिथी म्हणावी तशी गंभीर नाहीये परंतु कोविड चे सर्व नियम पाळूनच मतदान करवाई लागणार आहे.

2017 मध्ये, 17 जुलै रोजी निवडणुका झाल्या. ज्यामध्ये राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य मिळून इलेक्टोरल कॉलेज तयार करतात.शेवटच्या वेळी 17 जुलै 2017 रोजी नवीन राष्ट्रपती निवडण्यात आले होते. तेव्हा जवळपास पन्नास टक्के मते एनडीएच्या बाजूने होती, तसेच प्रादेशिक पक्षांतील बहुतांश पक्षांचा पाठिंबा होता. यावेळीही काही प्रादेशिक पक्षांच्या मदतीने एनडीए आपल्या मर्जीतील अध्यक्ष निवडण्याच्या जवळ आहे. मात्र, येत्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर त्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.शेष म्हणजे गेल्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना 65.35 टक्के मते मिळाली होती. अशा स्थितीत एनडीए यावेळीही हा आकडा स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. पीएम मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा मागितल्याचे समजते. मात्र, या दोन्ही नेत्यांना एनडीएच्या उमेदवाराचे नाव आधी बाहेर यावे आणि त्यानंतरच पाठिंब्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वाटते.

महत्वाच्या बातम्या –