मुतखड्याची लक्षणे व त्यावरील ‘हे’ घरगुती आहे उपाय, माहित करून घ्या

लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते.

ही आहेत मुतखड्याची लक्षणे

मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाहीत. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस जास्त वेदना होतात. पाठ, पोट, ओटीपोटात वेदना होतात. लघवीतून रक्त जाते. लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची भावना होते. लघवी करताना जळजळ होते. जंतुसंसर्ग होऊन थंडीताप येतो.

काही घरगुती उपाय

-अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटांत पोटदुखी थांबते.

-सराटा (काटेगोखरू)चा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.

-खडा लहान असल्यास आणि जुना नसल्यास मेंदीच्या सालीचे बारीक वाटण करून चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी वाटे निघून जातो.

-कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा रस अथवा काढा घेतल्याने वेदना कमी होते.

-कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.

महत्वाच्या बातम्या –