अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या

हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. याचा झटका कधीही आणि कुणालाही येऊ शकतो. जर पेशंट घरात एकटा असेल आणि हार्ट अटॅक आला तर त्याला कोणाचीच मदत मिळू शकत नाही. अशावेळी पेशंटने समजदारपणा आणि पेशंस बाळगायला हवे, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. यासोबतच हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काही टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं. नेमक्या काय टिप्स फॉलो कराव्यात याविषयी जाणून घेऊयात…

अशी वेळ आलीच तर आपल्या आजूबाजूला कुणी असेल तर त्याला बोलवा किंवा आपणच डॉक्टरला फोन करून त्यांना याबाबत कळवा.

मग हळूहळू पण दीर्घ श्वास घ्यायचा. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन वायू मिळेल. यानंतर अंगावरील कपडे थोडे सैल करा. यामुळे बेचैनी काही अंशी कमी होईल.

डॉक्टर येईपर्यंत आपणच काहीतरी उपाय सुरू केले पाहिजेत. आपले पाय थोड्या उंच ठिकाणी ठेवा. यामुळे पायातील रक्तप्रवाह हृदयापर्यंत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहील.

हे सर्व झालं की मग जमिनीवर सरळ झोपून थोडा आराम करा. यावेळी अजिबात हालचाल करायची नाही.

या काळात कितीही तहान लागली तरी पाणी किंवा एखादे सॉफ्टड्रिंक पिण्याची चूक मुळीच करू नका. कारण हृदयविकाराचा झटका आलेला असताना पाणी प्यायले तर उलटी येण्याचा संभव जास्त असतो.

उलटी आल्यास एका अंगावर एका कुशीवर पडून उलटी करा. कारण यामुळे फुफ्फुसात उलटी भरणार नाही.

हार्टअटॅक आला की काहीही खाऊ नका. जवळ सोरबिट्रेट गोळी नसेल तर अ‍ॅस्प्रीनची गोळी खाऊ शकता मात्र अ‍ॅस्प्रीनसोबत पाणी घेऊ नका. गोळी जीभेखाली ठेऊन चघळा.

महत्वाच्या बातम्या –