कोणत्या फळाचा रस कोणत्या आजारावर प्रभावी ठरतो, माहित करून घ्या

वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे. फळांमध्ये असे अनेक गुण आणि घटक असतात जे आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

संत्र्याचा रस – संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते. हेस्पेरीडिन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. ज्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.

इतर फायदे : किडनी स्टोन शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

अननसाचा रस – यात आढळणारे ब्रोमेलेन एंझाइम आहारातील प्रोटीन पचवण्यासाठी मदत करतात. रिकाम्यापोटी हा रस प्यायल्यास यातील ब्रोमेलेन एंझाइम अँटिइन्फ्लेमेटरी एजंट म्हणून काम करतात. यामुळे सांध्यात येणारी सूज आणि दुखण्याची समस्या कमी होते.

इतर फायदे : सर्दी, पडसे, कफ या आजारात अननसाचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो.

नारळपाणी – हे एखाद्या एनर्जी ड्रिंक्सपेक्षा कमी नाही. यात असणारे इलेक्ट्रोलाइट्स मिठाचा पुरवठा करतात.

इतर फायदे : रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवणे, एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.

डोळ्यांची कार्यक्षमता वाढेल : गाजराचा रस दररोज पिणे डोळ्यांसाठी चांगले असते. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

सफरचंदाचा रस – सफरचंदाच्या रसात ॲन्सेटालकोलीन नावाचे रसायन स्मरणशक्ती वाढवते आणि मेंदूची कार्यप्रणाली सक्षम ठेवते.

इतर फायदे : सफरचंदात फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्यामुळे पचन प्रणाली सुधारते आणि अपचनाची समस्या होत नाही.